जोहान्सबर्ग : जगातील सर्वात विषारी साप ब्लॅक मांम्बाला समजलं जातं. ब्लॅक मांम्बाचा दंश झाला, तर तासाच्या आत जीव जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान बॉलेर डेल स्टेनसमोर काही इंचावर जगातील सर्वात विषारी साप ब्लॅक मांम्बा आला.


सुरूवातील त्याला आणि त्याच्या मित्राला तो तपकिरी रंगाचा बिनविषारी साप वाटला, त्याला कारने धडक दिली होती, त्याला वाचवण्याचा त्याचा प्रयत्न होता, म्हणून तो आणखी जवळ गेला आणि एका क्षणात त्याला लक्षात आलं.


हा सर्वात विषारी ब्लॅक मांम्बा आहे, हा एका क्षणात आपल्याला संपवू शकतो. तेव्हा त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओत म्हटलंय. (व्हिडीओ खाली लावण्यात आलाय.) 


ज्याची आपल्याला ओळख नाही, त्याला एकटं सोडून देणंच महत्वाचं आहे. तसेच माझी ही पोस्ट हे दाखवण्यासाठी नाही की आम्ही किती बहादूर आहोत, पण हे आम्हाला सांगायचंय, की ज्याची ओळख नाही झाली, त्याला एकटं सोडून देणे हा या क्षणाचा सर्वात महत्वाचा आणि योग्य निर्णय आहे.