ब्रॅड हॉजने मागितली विराटची माफी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका चांगलीच गाजली. ही मालिका केवळ खेळ अथवा जय-पराजयामुळे नव्हे तर क्रिकेटपटूंच्या रंगलेल्या शाब्दिक चकमकींमुळे अधिक चर्चेत राहिली.
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका चांगलीच गाजली. ही मालिका केवळ खेळ अथवा जय-पराजयामुळे नव्हे तर क्रिकेटपटूंच्या रंगलेल्या शाब्दिक चकमकींमुळे अधिक चर्चेत राहिली.
या मालिकेदरम्यान विराट कोहलीवर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजनेही विराटवर टीका केली होती. मात्र आता त्याने या टीकेबद्दल जाहीर माफी मागितलीये.
ट्विटरवरुन त्याने विराट आणि क्रिकेटप्रेमींची माफी मागितलीये. तिसऱ्या कसोटीदरम्यान विराटला दुखापत झाली होती. त्यानंतर चौथ्या कसोटीत विराट दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. यावेळी हॉजने विराटच्या न खेळण्यावर संशय व्यक्त केला होता.
विराट चौथ्या कसोटीत खेळणार नाहीये कारण त्याला पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळायचे आहे असे विधान ह़ॉजने केले होते. आपल्या या विधानाबद्दल आता हॉजने माफी मागितलीये. माझा हेतू त्याला दुखवायचा नव्हता, असे हॉज म्हणालाय.
पाहा काय म्हणालाय तो