मुंबई: 2016 च्या टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं इंग्लंडला लोळवलं. शेवटच्या ओव्हरला 19 रनची आवश्यकता असताना वेस्ट इंडिजसाठी हा विजय अशक्य वाटत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेटनं इंग्लंडच्या बेन स्टोक्सला लागोपाठ 4 सिक्स मारून वेस्ट इंडिजला मॅच जिंकवून दिली. 


फायनलमध्ये वेस्ट इंडिजच्या विजयाचा हिरो ठरलेला कार्लोस ब्रेथवेट यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स टीमकडून खेळणार आहे.


आत्तापर्यंतच्या आठ सिझनमध्ये दिल्लीला एकदाही आयपीएलचं चॅम्पियन होता आलं नाही. त्यामुळे आता वेस्ट इंडिजच्या विजयाचा शिल्पकार दिल्लीचं भविष्य बदलतो का हे लवकरच समजेल.  


यंदाच्या सिझनमध्ये दिल्लीनं झहीर खानकडे संघाचं नेतृत्व दिलं आहे. येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलच्या नवव्या सिझनला सुरुवात होणार आहे.