नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा मैदानावर तसेच मैदानाबाहेर सरळ आणि शांत स्वभावासाठी ओळखला जायचा. मात्र टी-२० वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजने विजय मिळवल्यानंतर लाराचे वेगळेच रुप पाहायला मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या एका चॅनेलवर तज्ञ म्हणून सहभागी झालेल्या लाराने वेस्ट इंडिजच्या विजयानंतर चॅम्पियन गाण्यावर डान्स केला. आपल्या संघाच्या विजय झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यामुळे लाईव्ह टीव्हीवरच तो डान्स करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. 


वेस्ट इंडिजच्या विजयानंतर त्याचे सेलिब्रेशन जमैकापासून त्रिनिदादपर्यंत करण्यात आले. अंतिम रोमहर्षक सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडवर चार विकेटनी मात करत दुसऱ्यांदा जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.