`माझा गावसकर मला परत द्या`
जम्मू काश्मिरमध्ये श्रीनगरपासून 85 किमी अंतरावर असलेल्या हंदवारा शहरामध्ये निदर्शनं करणाऱ्या जमावावर लष्करानं गोळीबार केला.
श्रीनगर: जम्मू काश्मिरमध्ये श्रीनगरपासून 85 किमी अंतरावर असलेल्या हंदवारा शहरामध्ये निदर्शनं करणाऱ्या जमावावर लष्करानं गोळीबार केला. याप्रकरणी दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. यातला एक तरुण हा काश्मिरचा होतकरू तरुण होता. नयिम कादीर भट असं त्याचं नाव होतं.
तीन वर्षांपूर्वी नयिमची ऑल इंडिया लेव्हल कोचिंग कॅम्पसाठी निवड झाली होती. भारताकडून क्रिकेट खेळायचं त्याचं स्वप्न होतं. हंदवारापासून 30 किमी अंतरावर असलेल्या बारामुल्ला डिग्री कॉलेजला क्रिकेटच्या प्रॅक्टीससाठी जात होता. काश्मिरसाठी नयिम अंडर 19 लेव्हलची क्रिकेटही खेळला होता.
नयिमनं घरामध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, ब्रायन लारा, वसिम अक्रम आणि विराट कोहलीचे पोस्टरही लावले होते. नयिमच्या मृत्यूनं त्याच्या आईला मात्र जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. माझा गावसकर मला परत द्या, अशी भावनिक प्रतिक्रिया नयिमच्या आईनं दिली आहे.