काश्मीरमध्ये गोळीबारात होतकरू क्रिकेट खेळाडूचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरपासून ८५ किमी अंतरावर हंदवारा शहरात निदर्शने करणाऱ्यांना पांगविण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाला. यात होतकरू खेळाडूचा समावेश आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरपासून ८५ किमी अंतरावर हंदवारा शहरात निदर्शने करणाऱ्यांना पांगविण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाला. यात होतकरू खेळाडूचा समावेश आहे.
कथित प्रकरणी जवानांकडून छेडछाड केल्याचा आरोप करत काहींही आंदोलन करण्यासाठी निदर्शने करण्यास सुरुवात केली. यावेळी मोठा जमाव झाला. गर्दी पांगविण्यासाठी लष्काराच्या जवानांनी गोळीबार केला. यात दोन तरुणांचा मृत्यू झाला. यात नईम भट या विद्यार्थ्याचाही यावेळी गोळीबारात मृत्यू झाला. नईम भट याच्या मित्रांनी दावा केलाय की, तीन वर्षांपूर्वी भट अंडर-१९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये खेळलाय. नईम याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे. परवेझ रसूल याच्यासोबत क्रिकेटचा नेट सराव करतानाचा हा फोटो आहे.
याप्रकरणी लष्कराने चौकशीचे आदेश दिलेत. काश्मीर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी चौकशी सुरु केलेय. दोन्ही तरुणांच्या मृत्यूनंतर शहरात निदर्शने करण्यात येत आहेत. काश्मीरबरोबरच श्रीनगरमध्ये, पुलवामा येथेही निदर्शने करण्यात येत आहे.
दरम्यान, एक विद्यार्थिनी मंगळवारी शाळा सुटल्यानंतर घरी निघाली होती. रस्त्यात जवानांनी विद्यार्थिनीची छेड काढल्यामुळे नागरिकांनी आंदोलन केले होते. यावेळी नागरिकांनी जवानांवर दगडफेक केली. आंदोलकांना पांगविण्यासाठी जवानांनी केलेल्या गोळीबारात इक्बाल अहमद व नईम भट या दोघांचा मृत्यू झाला होता.