मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्यानिमित्ताने टीम इंडियात रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांचे कमबॅक झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघ आज इंग्लडंला रवाना होत आहे. इंग्लंडमध्ये १ जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होत आहे. टीम इंडियाचं नेतृत्व विराट कोहली करणार आहे.


चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोहली अॅण्ड कंपनीचा पहिलाच मुकाबला रंगणार आहे तो आपला कट्टर शत्रू पाकिस्तानशी. सध्या भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सीमारेषेवर जे काही सुरु आहे ते पाहता ही लढत अधिक धारदार होण्याची शक्यता आहे.


रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांनी दुखापतीनंतर कमबॅक केलं आहे. यामुळे रोहित पुन्हा ओपनिंग उतरेल आणि अश्विनवर बॉलिंगची जबाबदारी असेल. तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे भारतीय संघात पदार्पण करणारा युवराज सिंग तब्बल ११ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत पुनरागमन करतो आहे.


अशी आहे टीम इंडिया :


विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी (विकेट किपर), केदार जाधव, मनीष पांडे, हरदीप पांड्या, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रित बुमरा, उमेश यादव, मोहम्मद शमी , भुवनेश्वर कुमार स्टँडबाय: कुलदीप यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, शार्दुल ठाकूर, सुरेश रैना.