पुजारानं कोहलीला मागे टाकलं, टेस्ट क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप
रांचीमध्ये केलेल्या डबल सेंच्युरीचा फायदा चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीमध्ये पाहायला मिळत आहे.
मुंबई : रांचीमध्ये केलेल्या डबल सेंच्युरीचा फायदा चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीमध्ये पाहायला मिळत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या क्रमवारीमध्ये पुजारानं दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर फॉर्मसाठी झगडणारा विराट कोहली चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे. आयसीसीच्या क्रमवारीतलं पुजाराचं ही सर्वोत्तम क्रमवारी आहे.
या क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर कायम आहे तर बॉलरच्या यादीमध्ये रवींद्र जडेजानं पहिला क्रमांक गाठला आहे, तर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. टेस्ट क्रमवारीमध्ये अजूनही भारत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.