नागपूर: वेस्ट इंडिजचा खेळाडू क्रिस गेलचा डान्सचं प्रेम तर सगळ्याच क्रिकेट रसिकांना माहिती आहे. पण वेस्ट इंडिजचा पराभव झाल्यानंतरही गेल मैदानात नाचला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये अफगाणिस्ताननं वेस्ट इंडिजविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर अफगाणिस्तानचा जल्लोष गगनात मावेनासा झाला. 


विजयानंतर सेलिब्रेशन करताना अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी मैदानातच नाचायला सुरुवात केली. अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या या सेलिब्रेशनमध्ये वेस्ट इंडिजचा बॅट्समन क्रिस गेलही सहभागी झाला.  


पाहा गेलच्या डान्सचा व्हिडिओ