पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलच्या आक्रमक शतकामुळे जमैका तलावासने टी-२० कॅरेबियन प्रीमियर लीगच्या चौथ्या सत्रात दमदार विजय मिळवला. जमैकाने ट्रिनबागो नाईट रायडर्सवर १० चेंडू राखत सात विकेटनी मात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेलव्यतिरिक्त आणखी एक तुफानी फलंदाज आंद्रे रसेलने १८ चेंडूत दोन चौकार आणि एक षटकार लगावत २४ धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून विकेटकीपर कुमार संगकाराने २०, चाडविक वाल्टनने १३ आणि रमन पॉवेलने नाबाद १२ धावा केल्या. 


सुनील नारायणने चांगली गोलंदाजी करताना चार षटकांत ९ धावा देत एक विकेट घेतली. ट्रिनबागोने २० षटकांत चार बाद १९१ धावा केल्या. जमैकाने हे आव्हान १० चेंडू राखत सहज पूर्ण केले आणि विजय मिळवला.