लखनऊ : क्रिकेटर मोहम्मद शमीचे वडील तौसीफ अहमद यांचं गुरुवारी रात्री हृद्यविकाराच्या तीव्र धक्क्यानं मृत्यू झालाय. ही घटना घडली तेव्हा मोहम्मद शमी सध्या टीम इंडियासोबत कानपूरमध्ये होता... बातमी समजल्यानंतर त्यानं तात्काळ घराकडे धाव घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तौसिफ हे अमरोहाच्या सहसपूर अलीनगरचे रहिवासी होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. नुकतंच त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही पार पडली होती. 


गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका जाणवल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवलं. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.