मुंबई : अंधेरी स्थानकात अचानकपणे एक कार घुसली. रेल्वे स्थानकावर कार पाहताच अनेकांच्या भूवया उंचावल्या. पण यामध्ये कोणीही जखमी नाही झालं. जो व्यक्ती कार चालवत होता तो व्यक्ती अंडर 19 भारतीय टीमचा खेळाडू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी 7.15 मिनिटांनी ही कार अंधेरी स्थानकात आली. त्यानंतर त्याच्या अवतीभोवती लोकांची गर्दी झाली. जेव्हा कारमधला व्यक्तीची ओळख पटली तेव्हा तो भारतीय क्रिकेट अंडर 19 टीमचा खेळाडू असल्याचं समजलं. हरमीत सिंग असं या खेळाडूचं नाव आहे. 


मुंबई पोलिसांनी हरमीतला ताब्यात घेतलं असून तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचं म्हटलं जातंय. मेडिकल टेस्टमध्ये हे समोर आलं की तो दारु पिऊन गाडी चालवत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हरमीत हा मलाड येथे राहतो.



हरमीत हा अंडर 19 वर्ल्डकपचा देखील भाग होता. या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला. कारण गर्दीच्या वेळी ही घटना घडली. स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते पण सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही.