भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर बोलला शाहीद आफ्रीदी
उरी येथे दहशतवाद्यांनी लष्करी तळावर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे ७ तळ उद्ध्वस्त केले. यात ३८ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
इस्लामाबाद : उरी येथे दहशतवाद्यांनी लष्करी तळावर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे ७ तळ उद्ध्वस्त केले. यात ३८ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानाकडूनही प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालीये. पाकिस्तानचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू शाहीद आफ्रीदीनेही याप्रकरणी प्रतिक्रिया दिलीये.
त्याने सोशल मीडियावरुन आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीये. पाकिस्तान एक शांतीप्रिय देश आहे. जेव्हा संवादाने एखादा मुद्दा निकालात निघू शकता तेव्हा आपण इतके मोठे पाऊल का उचलतोय. पाकिस्तानला सर्व देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत, इतकंच बोलून आफ्रीदी थांबला नाही तर त्याने अजून एक ट्वीट केलेय.
जेव्हा दोन शेजारी एकमेकांशी लढतात तेव्हा दोन्ही घरांचे नुकसान होते, असेही त्याने ट्विटरवर म्हटलेय.