मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि भारत अ संघादरम्यान सुरु असलेल्या सराव सामन्यातील पहिल्या दिवशी नवदीपने टाकलेला बाऊंसर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर कदाचित विसरु शकणार नाही. दिल्लीच्या नवदीप सैनीने भारत अ कडून खेळताना जबरदस्त बाऊंसरवर वॉर्नरला बाद केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉर्नरची विकेट घेणे नवदीपसाठी मोठी गोष्ट होती. तेही खासकरुन बाऊंसरवर वॉर्नरसारख्या क्रिकेटपटूला बाद करणे ही त्यासाठीच नक्कीच मोठी गोष्ट असेल. 


यावर बोलताना नवदीप म्हणाला, बाऊंसरवर वॉर्नरला बाद करणे माझ्यासाठी खास आहे. माझ्या बॉलवर वॉर्नरने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बॉल त्याच्या बॅटला लागून उंच उडाला आणि विकेटकीपर इशानने हा सहज कॅच केला. 


पहिल्या दिवशी कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने समाधानकारक धावसंख्या उभारली. त्यांनी पहिल्या दिवशी तीनशेहून अधिक धावांचा टप्पा गाठला.