पुणे : येथे होऊ घातलेल्या डेव्हीस कप टेनिस सामन्यांदरम्यान भारताच्या लिएंडर पेसला जागतिक विक्रमाची संधी आहे. ४ फेब्रुवारी रोजी होणा-या दुहेरीमध्ये इटलीच्या निकोला पायट्रॅंजेली सोबत त्याची लढत होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हे दोघेही ४२ विजय आणि १२ पराभवांसह बरोबरीत आहेत. त्यांचा डेव्हीस कप स्पर्धेतील सामना पाहण्यसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. 


पुण्यात तब्बल ४३ वर्षांनंतर डेव्हीस कप सामने होताहेत. बालेवाडी क्रिडासंकुलात ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान डेव्हीस कप सामने रंगणार आहेत. एमएसएलटिए तर्फे या जागतीक दर्जाच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून पुणे महापालिका देखील त्यासाठी सज्ज झाली आहे.