मुंबई: भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये यंदाच्या वर्षी नवा अध्याय लिहिला जाणार आहे. या वर्षाच्या शेवटी भारत आणि न्यूझीलंडमध्ये डे अॅण्ड नाईट टेस्ट होणार आहे. या टेस्टसाठी गुलाबी बॉल वापरण्यात येणार आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या टेस्टआधी दुलीप ट्रॉफीमध्ये गुलाबी बॉलनं डे अॅण्ड नाईट टेस्ट खेळवली जाईल. गुलाबी बॉल रात्रीच्या वेळी भारतीय वातावरणात किती टिकतो तसंच दव, भारतीय स्पिनर्सची गुलाबी बॉलवरची कामगिरी पाहण्यासाठी दुलीप ट्रॉफीमध्ये याचा वापर होईल, असं ठाकूर म्हणाले आहेत. 


न्यूझीलंड यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारताचा दौरा करणार आहे. यात 3 टेस्ट, 5 वनडे आणि एका टी 20 चा समावेश आहे. पण ही डे अॅण्ड नाईट टेस्टचं ठिकाण मात्र अजूनही ठरलेलं नाही. 


दुलीप ट्रॉफीमध्ये खेळवल्या जाणाऱ्या डे अॅण्ड नाईट मॅचमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळणारेच खेळाडू खेळण्याची शक्यता आहे.