मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या लिलावामध्ये पवन नेगी हा सर्वात महागडा खेळाडू ठरला, पण मैदानामध्ये मात्र पवन नेगीची कामगिरी खराब झाली. 8.5 कोटी रुपयांना विकत घेतलेल्या पवन नेगीनं दिल्लीकडून खेळताना 9 ओव्हर टाकून फक्त एक विकेट घेतली तर 57 रन केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कामगिरीनंतर पवन नेगीला दिल्लीच्या टीमकडून डच्चू देण्यात आला. दिल्ली टीमच्या या निर्णयामुळे पवन नेगी नाराज झाला आहे. मैदानाबाहेरून मॅच बघणं माझ्यासाठी धक्कादायक होतं. मॅचच्या आधी मी टीममध्ये असणार का नाही याबाबतही मला माहिती नसायचं, आणि मला कोणी उत्तरंही द्यायचं नाही, असं नेगी म्हणाला आहे. 


चेन्नईकडून खेळताना मला धोनीनं पाठिंबा दिला, तसा पाठिंबा दिल्लीनं दिला नसल्याची प्रतिक्रिया पवन नेगीनं दिली आहे.