मुंबई  : बांगलादेशला हरवून भारताने सेमी फायनलमध्ये जाण्याची आपल्या आशा कायम ठेवल्या.  भारत सामना जिंकल्याचा आनंद आहे. मात्र विजयानंतरही जरा या सामन्याची  आवश्यकता आहे. गोलंदाजांची कामगिरी संमिश्र असली तरी फलंदाजीत बदल करण्याची आवश्यकता आहे. तीन सामन्यांत सरासरी तीस धावा करणा-या शिखर धवन, सुरेश रैना, युवराज सिंग आणि रोहित शर्माला आणखी किती सहन करायचे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


टी-२०मध्ये शतक आणि वनडेमध्ये द्विशतक ठोकणा-या रोहित शर्मासह डावखुरा शिखर धवन तसेच मधल्या फळीतील सुरेश रैना आणि युवराज सिंगमुळे भारताची फलंदाजी कागदावर तरी मजबूत वाटते. मात्र या चौकडीने निराशा केली. 


कोहलीने खेळपट्टीवर ठाण मांडल्याने चौघांचे फलंदाजीतील अपयश झाकले गेले तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. धवनला ३ सामन्यांत ३०, युवराज आणि रैनाला प्रत्येकी ३१ आणि रोहितला ३३ धावा करता आल्यात. म्हणजेच प्रत्येक लढतीत सरासरी १० धावा.


टी-२०मधील ‘स्टार’ फलंदाजांना ही कामगिरी शोभेशी नाही. बांगलादेशविरुद्धच्या लढतीचा विचार केल्यास डावखु-या धवनने २२ चेंडू खेळताना २ चौकार आणि एका षटकारासह २३ धावा केला. त्यातील १० चेंडू निर्धाव आहेत. ९ चेंडूंवर त्याला केवळ एक धाव घेता आली आहे. रोहितच्या १६ चेंडूंतील १८ धावांमध्ये ६ चेंडू ‘डॉट’ आहेत. आठ चेंडूंवर त्याला एकेरी धाव घेता आली आहे. 


रैना आणि युवराजचे अनुक्रमे ६ आणि ४ चेंडू निर्धाव आहेत. धवन, रोहित, रैना आणि युवराजचे मिळून २९ चेंडू निर्धाव आहेत. या चेंडूंवर प्रत्येकी एक धाव मिळाली असती तरी भारताने पावणेदोनशेच्या घरात झेप घेतली असती. धवन, रैना आणि युवराजचे ‘फुटवर्क’ योग्य नाही.