मीरपूर : आशिष नेहरा आणि जसप्रीत बुमराहच्या जागी संघात मोहम्मद शमीला तस्थान देणे कठीण वाटत आहे, असं कर्णधार महेंद्रसिंह धोनीने म्हटले आहे. ट्वेंटी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या समतोल असलेल्या भारतीय संघात शमीला बुमराह किंवा नेहराच्या जागी स्थान देणे कठीण आहे. शमी तंदुरुस्त होईल की नाही माहिती नाही. त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे, त्याला वेळ दिला पाहिजे. बुमराह नव्या चेंडूने चांगली गोलंदाजी करत असल्याचंही धोनीने म्हटलंय


हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा आठव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. तसेच ते दोघेही चार-चार षटके गोलंदाजी करु शकतात,' असे महेंद्र सिंह धोनीने म्हटलंय.


शमी ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी तंदुरुस्त असल्याचे बोलले जात आहे. आशिया करंडकात नेहरा आणि बुमराह यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. आशिया कपसाठी शमीची संघात निवड झाली होती. पण, दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली होती.