मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आता टीम इंडियाच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंसोबत एकत्र स्क्रीनवर दिसणार आहे. हे क्रिकेटपटू म्हणजे एमएस धोनी आणि विराट कोहली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना, विराट आणि धोनी एका जाहिरातीत एकत्र दिसणार आहेत. ही जाहिरात येत्या क्रिकेट सीरिजदरम्यान दाखवली जाणार आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी या जाहिरातीचे दिग्दर्शन करतायत. 


टी-२० वर्ल्डकपनंतर धोनी आणि कोहली सध्या आराम करत आहेत तर कंगना रंगून या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रंगूनमध्ये कंगना शाहीद कपूर आणि सैफ अली खान यांच्यासह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 


धोनी आणि विराट कंगनासह जाहिरात करण्यास उत्सुक आहेत. कारण व्यस्त शेड्यूल्ड असतानाही दोघांनीही या जाहिरातीसाठी वेळ काढलाय.