भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये नको - बीसीसीआय
उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढलाय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही(बीसीसीआयने) भारत आणि पाकिस्तान या देशांना एका गटात ठेवू नये अशी मागणी आयसीसीकडे केलीये.
नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढलाय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही(बीसीसीआयने) भारत आणि पाकिस्तान या देशांना एका गटात ठेवू नये अशी मागणी आयसीसीकडे केलीये.
बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले, सरकारने पाकिस्तानला एकाकी पाडण्याची रणनीती बनवलीये.
उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांबाबत संवेदना व्यक्त करताना आम्ही आयसीसीसकडे अपील केले आहे की दोन्ही देशांना एकाच गटात ठेवू नये.