डीआरएसचा नवीन फूलफॉर्म माहीत आहे का?
`कॅप्टन कूल` म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी आता भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन राहिला नसला तरी तो `कूल` मात्र नक्कीच आहे. त्याच्या क्रिकेट सेन्सचे किस्सेही तेव्हढेच कूल...
मुंबई : 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी आता भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन राहिला नसला तरी तो 'कूल' मात्र नक्कीच आहे. त्याच्या क्रिकेट सेन्सचे किस्सेही तेव्हढेच कूल...
विनाकारण त्रासलेला, वैतागलेला किंवा गरजेपेक्षा अधिक उत्साही धोनी क्वचितच कुणी पाहिला असेल... विनाकारण एखादी क्रिकेट अपीलही त्यानं क्वचितच केलेली पाहायला मिळाली...
अशीच एक अपील पाहायला मिळाली नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड वनडे सीरीजमध्ये... अम्पायर डिसीजन रिव्ह्यू सिस्टम (डीआरएस) लागू असताना पुणे आणि कटक दोन्ही वनडे मॅचमध्ये धोनीनं भारतासाठी डीआआरएसची मागणी केली आणि दोन्ही निकाल भारताच्या बाजुनंच लागलेले दिसले.
पुण्यात धोनीनं इंग्लंडचा कॅप्टन इयॉन मॉर्गनला नॉट आऊट दिल्यानंतर रिव्ह्यू मागितला आणि त्याला या रिव्ह्यूमध्ये आऊट घोषित करण्यात आलं.
त्यानंतर कटक वनडेमध्येही 41 व्या ओव्हरवर शेवटच्या बॉलवर युवराज सिंहची विकेटकिपर बटलरनं कॅच घेतली तेव्हा अम्पायरनं त्याला आऊट घोषित केलं. तेव्हाही धोनीनं लगेच डीआरएसची मागणी केली... रिव्ह्यूमध्ये धोनीचा अंदाजाच योग्य असल्याचा निर्वाळा दिला गेला... युवराज नॉट आऊट होता.
अम्पायर रिव्ह्यू योग्य पद्धतीनं वापरल्याबद्दल सध्या धोनीची जोरदार चर्चा सुरू आहे... म्हणून सध्या डीआरएसचं 'धोनी रिव्ह्यू सिस्टम' असं नवीन नामकरणही धोनीच्या फॅन्सनं करून टाकलंय.