इंदौर : किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर ६ विकेट्स राखून पंजाबने विजय मिळवला. १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. ४ विकेट लवकर गमावल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 44 आणि डेव्हिड मिलरने ३० रन्स केले. यामुळे पंजाबला सहजपणे विजय मिळवता आला.
  
बेन स्टोक्स आणि मनोज तिवारी यांच्या फटकेबाजीच्या बळावर पुणे संघाने पंजाबसमोर 164 धावांचे आव्हान ठेवले होते. या सामन्यामध्ये डीएसीसी प्लेअर मनोज तिवारी हा मोस्ट स्टायलिश प्लेअर तर अक्षर पटेलला बेस्ट कॅचर ऑफ द मॅच म्हणून निवडलं गेलं.