मोहाली : भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा पहिला डाव 283 रन्सवर आटोपला. टीम इंडियाकडून मोहम्मद शम्मीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
भारताकडून जडेजा, जयंत आणि उमेशने 2-2 विकेट घेतल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकत प्रथम बँटिंगचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडला पहिला झटका उमेश यादवने दिला. उमेशने हसीब हमीदला 9 रनवर आऊट केलं. तेव्हा इंग्लंडचा स्कोर ३२ रन होता. 15व्या आणि १६ व्या ओव्हरमध्ये इंग्लंडला आणखी २ मोठे झटके लागले. जयंत यादवने जो रूटला १५ रन आणि अश्विनने कुकला माघारी धाडलं.


बेयरस्टो आणि अली यांच्यामध्ये चौथ्या विकेटसाठी ३६ रन्सची पार्टनरशीप झाली. ही पार्टनरशिप नंतर शमीने तोडली. जोस बटलरने बेयरस्टोसोबत 69 रन्सची पार्टनरशिप केली आणि इंग्लंडने 200 रन्सचा टप्पा गाठला. बटलरला जडेजाने कोहलीच्या हातून कॅच आऊट केलं. पहिल्या दिवसाचा वेळ संपण्यापूर्वी उमेशने वोक्सला क्लीन बोल्ड केलं. इंग्लंडची टीम २८३ रन्सवर ऑलआऊट झाली.