मुंबई : चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेरीस इंग्लंडचा स्कोअर 288/5 झाला आहे. दिवसाच्या शेवटी बेन स्टोक्स 25 रनवर तर जॉस बटलर 18 रनवर खेळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेणाऱ्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. ओपनर जेनिंग्सनं टेस्टच्या पदार्पणातच सेंच्युरी मारली. तर कॅप्टन ऍलिस्टर कूकनंही 46 रन करून जेनिंग्सबरोबर 99 रनची ओपनिंग पार्टनरशिप केली. चार नंबरवर बॅटिंगला आलेल्या मोईन अलीनंही हाफ सेंच्युरी लगावली.


भारताकडून आर.अश्विननं सर्वाधिक चार विकेट काढल्या तर जडेजाला एक विकेट घेण्यात यश आलं.