राजकोट : इंग्लंडविरुद्धची पहिली टेस्ट कशीबशी ड्रॉ करण्यात भारताला यश आलं आहे. शेवटच्या दिवसाअखेर भारताचा स्कोअर 172/6 एवढा झाला. इंग्लंडनं दिलेल्या 310 रनचा पाठलाग करताना भारताला शून्य रनवरच गंभीरच्या रुपात पहिला धक्का बसला, यानंतर मात्र भारताची पडझड होतच राहिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीच्या नाबाद 49, रवींद्र जडेजाच्या नाबाद 32 रन आणि अश्विनच्याही 32 रनमुळे ही टेस्ट ड्रॉ करण्यात भारताला यश आलं. चौथ्या दिवसाअखेर बिनबाद 114 रनपर्यंत मजल मारणाऱ्या इंग्लंडच्या ओपनिंग बॅट्समननी आजही भारतीय बॉलर्सना रडवलं. कॅप्टन ऍलिस्टर कूकनं 130 रनची शानदार खेळी केली तर हसीब हमीद 82 रनवर आऊट झाला. 260/3 असा स्कोअर असताना इंग्लंडनं डाव घोषित केला.