टूर्नामेंटदरम्यान डान्स शो पाहण्यास गेले पाकिस्तानचे क्रिकेटर्स
पाकिस्तानचे पाच क्रिकेटपटू नॅशनल वनडे कपदरम्यान गैरवर्तन केल्याप्रकरणी क्रिकेट बोर्डाच्या चौकशीच्या कचाट्यात सापडेल आहेत.
कराची : पाकिस्तानचे पाच क्रिकेटपटू नॅशनल वनडे कपदरम्यान गैरवर्तन केल्याप्रकरणी क्रिकेट बोर्डाच्या चौकशीच्या कचाट्यात सापडेल आहेत.
उमर अकमल, मोहम्मद नवाज, बिलावल भट्टी, ओवेस जिया आणि शाहीद युसुफ हे पाचही क्रिकेटपटू टूर्नामेंटदरम्यान एका स्थानिक थिएटरमध्ये डान्स शो आणि ड्रामा पाहण्यासाठी गेले होते. स्पर्धेतून डान्स शो पाहायला गेल्याचे प्रकरण या क्रिकेटपटूंना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे.
टीव्ही चॅनेलच्या एका फुटेजमध्ये दाखवल्यानंतर हे प्रकरण समोर आले. त्या फुटेजमध्ये उमर अकमल थिएटरमधील काही लोकांशी वाद घालत होता. त्यानंतर त्याने रागाने त्या लोकांना दिशेने इशारा केला. दरम्यान, अकमल हे आरोप फेटाळून लावलेत.
याप्रकरणी बोलताना अकमल म्हणाला, तुम्ही माझ्या क्रिकेटमधील प्रदर्शनाबद्दल बोला अथवा लिहा. मात्र माझ्या खासगी जीवनाबद्दल लिहिण्याचा तुम्हाला हक्क नाही. हे योग्य नाही. तसेच बोर्डाकडून या प्रकरणाचा तपास होत असल्याचा मीडिया रिपोर्टही त्याने फेटाळून लावलाय.