गुरमेहरवरून गंभीरचं सेहवागला जोरदार प्रत्यूत्तर
कारगिल युद्धातील शहीद मनदीप सिंग यांची मुलगी गुरमेहर कौर हिच्या एका व्हिडिओवरून बराच वादंग उठलाय. या वादात आता टीम इंडियाचे दोन क्रिकेटरही एकमेकांविरोधात उतरले.
मुंबई : कारगिल युद्धातील शहीद मनदीप सिंग यांची मुलगी गुरमेहर कौर हिच्या एका व्हिडिओवरून बराच वादंग उठलाय. या वादात आता टीम इंडियाचे दोन क्रिकेटरही एकमेकांविरोधात उतरले.
क्रिकेटच्या मैदानात एकमेकांचे साथीदार म्हणून खेळलेले टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत.
'मी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये शिकते... मी एबीव्हीपीला घाबरत नाही. मी एकटी नाही... भारताचा प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे #StudentAgainstABVP' असं ट्विट गुरमेहर कौरनं केलं होतं.
या ट्विटनंतर सोशल मीडियावर गुरमेहरला बलात्काराची धमकीही मिळाली. इतकंच नाही तर गुरमेहरचा एक जुना व्हिडिओही पुन्हा एकदा समोर आणण्यात आला. या व्हिडिओत भारत-पाकिस्तानमध्ये शांततेचं आवाहन करत तिनं 'माझ्या वडिलांना पाकिस्ताननं नाही तर युद्धानं ठार केलंय' असं म्हटलं होतं.
तिच्या याच वाक्यावर बोट ठेवत सेहवागनंही एक ट्विट केलं. यामधल्या फोटो वीरूच्या हातात एक कागद होता ज्यावर लिहिलं होतं... 'दोनदा तिहेरी शतक मी नाही तर माझ्या बॅटने ठोकले... Bat में हैं दम... #भारत_जैसी_जगह_नहीं'.
वीरुच्या या ट्विटनंतर अनेकांना त्याचं हे ट्विट गुरमेहरला टोला असल्याचं म्हटलं. तर अनेकांनी वीरूच्या या ट्विटला धारेवर धरलं. त्यातच गौतम गंभीरनंही एक व्हिडिओ ट्विट करत गुरमेहरचं समर्थन केलंय.