नवी दिल्ली : बीसीसीआयच्या निवड समितीने भारत आणि इंग्लंड यांच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उरलेल्या तीन कसोटी सामन्यांसाठी मंगळवारी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संघात फारसे बदल करण्यात आलेले नाही. मात्र अनुभवी गौतम गंभीरला संघातून डच्चू देण्यात आला असून त्याच्या जागी भुवनेश्वरला संधी देण्यात आलीये. 


संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेने याआधी दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंसाठी नवीन प्रोटोकॉल बनवले. यानुसार दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी स्थानिक क्रिकेट सामने खेळणे गरजेचे आहे. 


भुवनेश्वर कुमारने रणजी क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केल्याने त्याला भारतीय संघात पुन्हा स्थान देण्यात आलेय. न्यूझीलंडविरुद्धच्या कोलकाता येथे झालेल्या कसोटी सामन्यात भुवनेश्वरने पाच विकेट घेतल्या होत्या. मात्र दुखापतीमुळे तो इंदूरच्या कसोटीमध्ये खेळू शकला नव्हता. 


भारतीय संघ - विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पटेल