कोलकता: कोलकता नाईट रायडर्सनं किंग्ज इलेव्हन पंजाबचा 7 रन्सनं पराभव केला आहे. या मॅचमध्ये केकेआरचा कॅप्टन गौतम गंभीर 45 बॉलमध्ये 54 रन बनवून रन आऊट झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण या रन आऊटमुळे गंभीरचं आयपीएलमध्ये अनोखं रेकॉर्ड झालं आहे. गंभीर हा आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा रन आऊट होणारा खेळाडू बनला आहे. गंभीर आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 13 वेळा रनआऊट झाला आहे. गंभीरनंतर मुरली विजय 12 वेळा तर युसुफ पठाण 10 वेळा रनआऊट झाला आहे.