सुकमातील शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार गंभीर
भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 25 सीआरपीएफ जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी स्विकारलीये..
नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 25 सीआरपीएफ जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी स्विकारलीये..
गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून आपण मदत करणार असल्याचं गंभीरनं जाहीर केलंय. या संदर्भात महत्त्वाची पावलं उचलण्यासही सरुवात झालीये.. लवकरच यासंदर्भातली माहिती जाहीर केली जाईल असंही त्यानं म्हटलंय..
शहीद सीआरपीएफ जवानांच्या सन्मानार्थ गौतम गंभीरच्या नेतृत्वात खेळणा-या कोलकाता नाईट रायडर्स संघानं पुण्याविरोधातील सामन्यात हाताला काळी पट्टीही बांधली होती.