राजकोट : यंदाच्या आयपीएलमध्ये अखेर क्रिस गेलला सूर गवसला आहे. गुजरात लायन्सविरुद्धच्या मॅचमध्ये गेलनं ३८ बॉल्समध्ये ७७ रन्सची खेळी केली आहे. गेलच्या या खेळीमध्ये ७ सिक्स आणि ४ फोरचा समावेश आहे. गेलच्या या वादळी खेळीमुळे आरसीबीनं गुजरात लायन्सचा २१ रन्सनं पराभव केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकून गुजरातनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला पण गेल आणि कोहलीनं गुजरातच्या बॉलर्सचा धुव्वा उडवला. कोहलीनं ५० बॉल्समध्ये ६४ रन्सची खेळी केली. यानंतर बॅटिंगला आलेल्या ट्रॅव्हिस हेड आणि केदार जाधवनंही गुजरातच्या बॉलर्सना धुळ चारली. हेडनं १६ बॉल्समध्ये नाबाद ३० आणि जाधवनं १६ बॉल्समध्ये नाबाद ३८ रन्स बनवल्या. २० ओव्हरमध्ये आरसीबीनं २१३/२ एवढी मजल मारली.


एवढ्या मोठ्या रन्सचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात वाईट झाली. स्कोअरबोर्डवर फक्त एक रन असताना ड्वॅन स्मिथ आऊट झाला. त्यानंतर मॅकल्लम आणि रैनानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण गुजरातला यश आलं नाही. मॅकल्लमनं ४४ बॉल्समध्ये ७२ रन्स आणि रैनानं फक्त ८ बॉल्समध्ये २३ रन्स केल्या. सात नंबरला बॅटिंगला आलेल्या इशान किशननंही १६ बॉल्समध्ये ३९ रन्सची फटकेबाजी केली पण तरीही गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला.