अॅन्टिग्वा : टी20, वनडे किंवा टेस्ट असो, विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये कोहलीनं डबल सेंच्युरी झळकावली. टेस्ट क्रिकेटमधली कोहलीची ही पहिलीच डबल सेंच्युरी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीला रोखण्याचं आव्हान वेस्ट इंडिजच्या बॉलरपुढे आहे. विराटला रोखण्यासाठीचा अजब सल्ला हरभजन सिंगनं वेस्ट इंडिजच्या बॉलरना दिला आहे. विराट कोहलीला रोखायचं असेल तर त्याची किट बॅग लपवून ठेवा, तरच तुम्हाला त्याला रोखता येईल, असं ट्विट हरभजननं केलं आहे.