मुंबई: आयपीएलच्या नवव्या मोसमाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांची उत्सुकता ताणली गेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण यंदाच्या आयपीएलमध्ये हर्षा भोगले कॉमेंट्री करताना दिसणार नाही. खुद्द हर्षा भोगलेनंच याबाबतचं ट्विट केलं आहे. तसंच कॉमेंट्री करता येणार नसल्याबद्दल त्यानं खंतही व्यक्त केली आहे. 


आयपीएलमध्ये कॉमेंट्री करता आली असती तर चांगलं झालं असतं, आवडत्या टुर्नामेंटमध्ये कॉमेंट्री करण्यासाठी उत्सुक होतो. पण आयपीएलचा हा सिझन यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे, असं ट्विट हर्षा भोगलेनं केलं आहे.