मुंबई : सध्याचे खेळाडू खूप लवकर रेकॉर्ड बनवतात. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हाशिम अमलाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५० शतकं पूर्ण केली आहेत. अमला असं करणारा जगातील सातवा खेळाडू ठरला आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर १०० शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमलाने श्रीलंकेच्या विरोय़धात पाचव्या वनडेमध्ये शतक ठोकत आपल्या करिअरमधील ५० शतकं पूर्ण केलीत, 100 टेस्ट मॅचमध्ये 26 आणि 145 वनडेमध्ये 24 शतकं त्यांनी केली आहेत. 


या यादीत सचिन तेंडुलकर (100 शतक), ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (71), श्रीलंकेचा कुमार संगकारा (63), दक्षिण अफ्रिकेचा जॅक कॅलिस (62), श्रीलंकचा महेला जयवर्धने (54) आणि वेस्टइंडीजचा ब्रॅन लारा (53) यांचा समावेश आहे.


दक्षिण अफ्रिकेचा डिविलियर्स (45 शतकं) आणि भारतीचा कर्णधार विराट कोहली 43 शतकांसह या यादीत समावेश होण्याच्या मार्गावर आहेत.