मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी या सामन्यातून खूप काही शिकलो असे सलामीवीर शिखर धवनने सांगितले. या सामन्यात शिखरने ७३ धावांची खेळी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताचा डाव १९२ धावांवर संपुष्टात आला. सामना संपल्यानंतर धवन म्हणाला, व्यक्तिगत पातळीवर या सामन्यातून मी खूप काही शिकलो. या सामन्यात १५-१६व्या षटकापर्यंत धवन खेळपट्टीवर होता. त्यामुळे पुढील सामन्यांसाठी याचा मला फायदा झाला.


टी-२० वर्ल्डकपच्या मुख्य फेरीत भारताचा पहिला सामना १५ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. भारताने पहिल्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजला ४५ धावांनी हरवले होते.