पुणे : वनडे आणि टी-२०चे कर्णधारपद सोडल्यानंतर क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीने शुक्रवारी पहिल्यांदाच मीडियाशी बातचीत केली. मी जरी कर्णधारपदावरुन निवृत्त झालो असलो तरी मैदानात विराटला वेळोवेळी सल्ला देत राहीन असे धोनी म्हणाला. यावेळी विराटचे त्याने तोंडभरुन कौतुक केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधारपदाच्या १० वर्षांकडे तु कशापद्धतीने पाहतोस असे धोनीला विचारले असता तो म्हणाला,  कर्णधारपदावर असताना मी चांगले आणि वाईट दोन्ही क्षण अनुभवले. एकूण पाहता हे सर्व एका प्रवासासारखे होते. कोणत्या गोष्टीचा पश्चाताप वाटतोय का असे विचारले असता तो पुढे म्हणाला जीवनात अशी कोणतीही गोष्ट नाही केली ज्यामुळे पश्चाताप होईल. तसेच टीमचेही कौतुक केले. 


भारतीय संघाचे भविष्य उज्वल आहे. आज आपल्याकडे असे चांगले गोलंदाज आहेत जे कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजी करु शकतात. तसेच चांगले फलंदाजही आहेत. यामुळे संघातील खेळाडूबाबतच्या दुखापतीची समस्या राहत नाही. 


जरी मी कर्णधारपदावरुन निवृत्त झालो असलो तरी वेळोवेळी विराटला सल्ला देत राहीन. विकेट कीपर हा उपकर्णधारसारखा असतो. यावेळी त्याला विचारले की तो पुन्हा जुन्या भूमिकेत येतोय तर आपले केस वाढवणार का? तेव्हा धोनी म्हणाला आता केस पुन्हा वाढवणार नाही. 


बॅटिंग ऑर्डरबाबत बोलताना तो म्हणाला, मी संघाच्या गरजेनुसार बॅटिंग ऑर्डर बदलत राहणार. कर्णधारपदावरील आव्हानांबाबत तो म्हणाला, कसोटीच्या तुलनेत वनडेमध्ये नेतृत्व करणे सोपे असते. येथे तुम्हाला झटपट निर्णय़ घ्यावे लागतात. मात्र कसोटीच्या तुलनेत हे सोपे असते. कोहली आधीपासूनच कसोटी कर्णधारपद सांभाळतोय त्यामुळे या नव्या जबाबदारीचा त्याच्यावर तितका दबाव नसणार आहे. क्रिकेट हा खेळ शारिरीकसह माइंडगेम आहे. 


धोनी पुढे म्हणाला, मी नेहमी नव्या खेळाडूंना वरच्या क्रमांकावर खेळण्यास प्राधान्य द्यायचो. त्यामुळे मी खालच्या क्रमांकावर खेळण्यास येत असे. क्रिकेटमध्ये तुमच्या स्वत:च्या रेकॉर्डला तितकेसे महत्त्व नसते.