मुंबई : आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाचा युवा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या २ कसोटी सामन्यांमध्ये ही  निराशाजनक कामगिरी ठरली आहे. या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये मिळून विराटच्या खात्यात फक्त ४० धावा जमा झाल्या आहेत. 


विराटची त्यामुळं ८४८ रेटिंग गुणांसह  तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. बंगळुरू कसोटीत ९२ धावांची धीरोदात्त खेळी करणाऱ्या चेतेश्वर पुजारानं अकराव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. अजिंक्य रहाणे पंधराव्या, तर लोकेश राहुल तेविसाव्या स्थानावर दाखल झाला आहे.


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ ९३६ गुणांसह आणि इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट ८४९ गुणांसह या क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.