मुंबई :  अखेरच्या षटकापर्यंत उत्सुकता ताणविणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ३ धावांनी पराभव केला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताला दक्षिण आफ्रिकेच्या १९७ धावांचा पाठलाग करताना सुरूवातीला तीन धक्के बसले. रोहीत (१०), विराट कोहली (१) आणि अजिंक्य रहाणे (११) धावांवर बाद झाले. त्यानंतर शिखर धवन याने ५३ चेंडूत ७३ धावांची खेळी केली त्यात १० चौकारांचा समावेश आहे. त्याला सुरेश रैनाने चांगली साथ दिली. रैनाने २६ चेंडूत ४१ धावा काढल्या. त्यात ३ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. सराव सामना असल्याने त्यांना रिटायर हर्ट करण्यात आले. 


शिखर आणि रैना रिटायर झाल्यानंतर भारताला १८ चेंडू ४३ रन्सची गरज होती. त्यावेळी धोनीने १६ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारच्या मदतीने ३१ धावा केल्या. तर युवराजने ८ चेंडूत १ चौकार आण १ षटकाराच्या मदतीने १६ धावा केल्या. 


दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १९६ धावा केल्या. आफ्रिकेकडून अष्टपैलू जेपी ड्युमिनी याने ४४ चेंडूत ६७ धावा केल्या. त्यात ६ चौकार आणि ३ षटकार लगावले. तर त्याला क्विंट डि कॉक याने चांगली साथ देत ३३ चेंडूत ५६ धावा केल्या. यात त्याने ७ चौकार आणि दोन उत्तुंग षटकार लागवले. सराव सामना असल्याने डी-कॉक अर्धशतक झाल्यावर रिटायर हर्ट होऊन तंबून गेला.


भारताकडून हार्दिक पांड्याने ३६ धावा देत २ विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि बुमरा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. 



या सामन्यातील संघ... 


भारत: महेन्द्र सिंह धोनी(कप्तान), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंह, हार्दिक पांड्या, रवीन्द्र जडेजा, रविचन्द्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, हरभजन सिंह, अजिंक्य रहाणे, पवन नेगी, मोहम्मद शमी।


साउथ आफ्रिका:
फाफ डू प्लेसिस(कप्तान), क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), एबी डीविलियर्स, जेपी डुमिनी, काइल एबॉट, हाशिम अमला, फरहान बेहरादीन, इमरान ताहिर, क्रिस मोरिस, डेविड मिलर, कगिसो रबाडा, राइली रूसो, डेल स्टेन, डेविड वीस, एरन फंगीसो।