महाराष्ट्रातून `आयपीएल` हद्दपारीवर भडकला राहुल द्रविड
३० एप्रिलनंतर होणाऱ्या `आयपीएल ९`च्या मॅचेस महाराष्ट्रबाहेर आयोजित करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. मात्र, यावर भारताचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड यानं मात्र प्रचंड नाराजी व्यक्त केलीय.
नवी दिल्ली : ३० एप्रिलनंतर होणाऱ्या 'आयपीएल ९'च्या मॅचेस महाराष्ट्रबाहेर आयोजित करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. मात्र, यावर भारताचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड यानं मात्र प्रचंड नाराजी व्यक्त केलीय.
क्रिकेट सॉफ्ट टार्गेट
हायकोर्टाच्या निर्णयानंतर तब्बल १३ मॅचेस महाराष्ट्राबाहेर हलवाव्या लागल्यात. काहीतरी वादंग निर्माण करायचा म्हणून क्रिकेट हे एक सॉफ्ट टार्गेट बनल्याचं, राहुलनं म्हटलंय.
...तर क्रिकेटचं बंद करा
'पाण्याचा प्रश्न हा एक गंभीर मुद्दा आहे. पाण्याच्या कमतरतेनं अनेक जणांना आपले जीव गमवावे लागत आहेत. परंतु, या प्रश्नाचा संबंध आयपीएलशी जोडल्यानं या प्रश्नाची तीव्रताच नष्ट झालीय... परंतु, जर आयपीएल नसल्यानं महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सुटणार असेल तर आपण क्रिकेट खेळणंच बंद करायला हवं', अशी तिखट प्रतिक्रिया 'द वॉल' राहुलनं दिलीय. पाण्याचा भीषण प्रश्न आणि आयपीएलचा संबंध लावणं चुकीचं असल्याचं त्यानं म्हटलंय.