विराट कोहलीचे शानदार शतक, भारत ३ बाद ३५६
भारत - बांग्लादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद ३५६ धावा केल्यात.
हैदराबाद : भारत - बांग्लादेश यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद ३५६ धावा केल्यात.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट १११ तर अजिंक्य रहाणे ४५ धावांवर खेळत होते. मुरली विजय शतक फटकावून बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीची सूत्रे आपल्या हाती घेत जोरादर फटकेबाजी केली.
आक्रमक पवित्रा घेणाऱ्या विराटने आपले कसोटी कारकीर्दीतील १६वे शतक पूर्ण केले. त्याने अवघ्या १३० चेंडूतच शतकी मजल मारली. दरम्यान, त्याने अजिंक्य रहाणेसोबत १२२ धावांची भागीदारी करत भारताला पहिल्या दिवसअखेर ३५६ धावांपर्यंत मजल मारली.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर लोकेश राहुलच्या रुपात भारताला पहिल्याच षटकात धक्का बसला. मात्र लोकेश राहुल (२) स्वस्तात बाद झाल्यानंतर चेतेश्वर पूजारा आणि मुरली विजयने डाव सावरत उपाहारापर्यंत भारताला १ बाद ८६ धावांपर्यंत मजल मारली.