भारताचा झिम्बाब्वेला ३-० ने व्हाईटवॉश
कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या कॅप्टन्सीखाली टीम इंडियाने झिम्बाब्वे दौऱ्यातील वनडे सीरीज स्वत:च्या नावावर केली आहे. झिम्बाब्वे विरोधातील ३ पैकी २ मॅच भारताने जिंकल्या आहेत. आज दोघांमध्ये तिसरी वनडे रंगते आहे.
हरारे : भारत विरुद्ध झिम्बाब्वे तिस-या वनडेत भारतानं झिम्बाब्वेचा १० गडी राखून पराभव केला आहे. फैज फैझलने पहिल्या डेब्यू मॅचमध्ये ६१ बॉलमध्ये ७ फोर आणि १ सिक्ससह ५५ धावा केल्या. लोकेश राहुलनंही नाबाद खेळीच्या जोरावर ४ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा काढल्या. फैज फझल आणि लोकेश राहुलनं नाबाद १२६ धावांची भागीदारी केली.
भारताकडून जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी करत ४ तर चहलने २, पटेल आणि कुलक्रणीने प्रत्येकी एक विकेट घेतली.