अँटिग्वा : कर्णधार विराट कोहलीच्या तडाखेबंद डबल सेंच्युरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताने पहिली इनिंग ८ बाद ५६६वर घोषित केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी कोहली आणि अश्विननं जोडीनं वेस्ट इंडिजच्या बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला.


विराट कोहली आणि अश्विननं पाचव्या विकेटीसाठी 168 रन्सची पार्टनरशिप रचली. अश्विनने ११३ धावांची खेळी केली. अमित मिश्रानेही हाफ सेंच्युरी केली. 


वेस्ट इंडिजतर्फे देवेंद्र बिशू आणि क्रेग ब्रेथवेटनं प्रत्येकी तीन विकेट्स तर शॅनोन गॅब्रिएलनं दोन विकेट्स घेतल्या. दुसरा दिवस संपला तेव्हा वेस्ट इंडिजची धावसंख्या 1 बाद 31 अशी होती.