विशाखापट्टनम : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या जर्सीवर देवकी लिहिलं आहे. उपकर्णधार विराट कोहलीच्या जर्सीवर सरोज लिहिलं आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का. ऐरवी प्रत्येक खेळा़डूच्या मागे त्याच्या टीशर्टर खेळाडूचं नाव असतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार प्लसच्या एका अभियानासाठी त्यांनी असं केलं आहे. प्रत्येक खेळाडूच्या पाठीवर आज त्यांच्या किंवा त्यांच्या पित्याच्या नावा ऐवजी त्यांच्या आईचं नाव लिहिण्यात आलं आहे.क्रिकेटर्समुळे याला अधिक चालणा मिळले आणि चॅनेलने यासाठी बीसीसीआयसोबत करार देखील केला आहे.


काही दिवसापूर्वी वनडे टीमचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी, टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अंजिक्य रहाणे एका जाहिरातीत दिसले होते. यामध्ये हे खेळाडू या उपक्रमाचं समर्थन करतांना दिसले. धोनीने तेव्हा म्हटलं होतं की मी जेव्हा माझ्या वडिलांच्या नावाचं टीशर्ट घालत होतो तेव्हा कोणी याचं कारण नाही विचारलं.


विराटचं म्हणणं होतं की. मी आज जेपण आहे ते माझ्या आईमुळे, मी तितका कोहली आहे तितकाच सरोज देखील आहे.


रहाणे म्हणतो की, लोकं म्हणतात की, वडिलांचं नाव रोशन करा. पण माझ्यासाठी आईचं नाव रोशन करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे.