मुंबई: 2016 चा टी 20 वर्ल्ड कप नुकताच संपला आहे. यानंतर आयसीसीनं टी 20 चं रॅकिंग जाहीर केलं आहे. नव्या रॅकिंगनुसार विराट कोहली हा बॅट्समनमध्ये एक नंबरवर आहे. या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला मॅन ऑफ द टुर्नामेंटचा किताबही देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅट्समनच्या या रॅकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऍरोन फिन्च दुसऱ्या तर इंग्लंडचा जो रुट तिसऱ्या क्रमांकावर आहे. फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच पटकवणाऱ्या मार्लोन सॅम्युअल्सही टॉप 20 मध्ये आला आहे. 


बॉलर्सच्या रॅकिंगमध्ये वेस्ट इंडिजचा सॅम्युअल बद्री एक नंबरवर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आर. अश्विनला बॉलर्सच्या यादीमध्ये तिसरा क्रमांक मिळाला आहे. भारताचा जसप्रित बुमराह या क्रमवारीत 7 नंबरवर तर आशिष नेहरा 11 नंबरवर आहे. 


तर टी 20 मध्ये देशाच्या रॅकिंगमध्ये भारत 126 रेटिंगसह एक नंबरवर कायम आहे. तर टी 20 वर्ल्ड कप जिंकणारी वेस्ट इंडिज 125 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


या क्रमवारीमध्ये न्यूझीलंड तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या, दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि ऑस्ट्रेलिया सहाव्या क्रमांकावर आहे. ग्रुप स्टेजमध्येच घरी गेलेली पाकिस्तान सातव्या आणि श्रीलंका आठव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. 


तर या वर्ल्ड कपमध्ये वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिजला हरवलेली अफगाणिस्तान नवव्या क्रमांकावर आणि बांग्लादेश दहाव्या क्रमांकावर आहे.