युवी-धोनीनं इंग्लंडला धुतलं, भारताचा धावांचा डोंगर
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे. भारतानं 50 ओव्हरमध्ये 381 रन केल्या आहेत.
कटक : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे. भारतानं 50 ओव्हरमध्ये 381 रन केल्या आहेत. 25/3 अशी अवस्था असताना धोनी आणि युवराजनं झळकावलेल्या धमाकेदार सेंच्युरीमुळे भारताला एवढी मजल मारता आली.
युवराज सिंगनं 127 बॉलमध्ये 150 तर धोनीनं 122 बॉलमध्ये 134 रन केल्या. युवराजच्या इनिंगमध्ये 3 सिक्स आणि 21 फोरचा आणि धोनीच्या इनिंगमध्ये 6 सिक्स आणि 10 फोरचा समावेश होता. तीन मॅचच्या या सीरिजमध्ये आव्हान कायम ठेवण्यासाठी इंग्लंडला ही मॅच जिंकणं आवश्यक आहे. याआधी पुण्यातल्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला होता.