चेन्नई : पाचव्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या बॅट्समननी उभारलेल्या धावांच्या डोंगराला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं बिनबाद 60 रन बनवल्या आहेत. के.एल.राहुल 30 रनवर तर पार्थिव पटेल 29 रनवर नाबाद होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या दिवसाची सुरुवात 284/4 अशी करणाऱ्या इंग्लंडची पहिली इनिंग 477 रनवर आटोपली. आठ नंबरला बॅटिंगला आलेल्या डॉसननं नाबाद 66 तर नऊ नंबरच्या आदिल रशीदनं केलेल्या 60 रनमुळे इंग्लंडला एवढी मजल मारता आली.


भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर उमेश यादव आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी दोन विकेट मिळवता आल्या.