दुबई : गेल्या कित्येक दिवसांपासून भारतानं वनडे क्रिकेट खेळलेलं नाही. असं असलं तरी वनडे क्रमवारीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे, तर विराट कोहली या क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या, न्यूझिलंड दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाकडे 124, न्यूझिलंडकडे 113 आणि भारताकडे 110 पॉईंट्स आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये 813 पॉईंट्ससह कोहली दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचाच हाशिम आमला वनडे क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. टॉप 10 बॅट्समनमध्ये कोहलीबरोबरच भारताचा रोहित शर्मा सातव्या आणि शिखर धवन आठव्या क्रमांकावर आहे.