हैदराबाद : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील एकमेव टेस्ट मॅच हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये साहजिकच यजमान टीम इंडियाचं पारडं जड असणार आहे. मात्र, बांग्लादेशलाही कमी लेखून चालणार नाही. कॅप्टन कोहलीसमोर प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी द्यावी याचं आव्हान असणार आहे. 


अजिंक्य रहाणे आणि करुण नायरपैकी कोणाला संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. बांग्लादेशाला टेस्टच्या पाच दिवस उत्तम खेळ करावा लागणार आहे. आता मुशफिकर रहिमची टीम भारतीय टीमला कडवं आव्हान देते का ते पाहण महत्वाचं ठरणार आहे. 


सामन्याची वेळ : सकाळी साडेनऊ वाजता.