मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट आजपासून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.. पाच मॅचच्या टेस्ट सिरीजमध्ये टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र मुंबई टेस्ट सुरु होण्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला दोन मोठे धक्के बसलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकर अजिंक्य रहाणे मुंबईत होणा-या टेस्टला मुकणार आहे. सराव करताना जायबंदी झाल्यानं तो या टेस्टमध्ये खेळू शकणार नाही. रहाणेच्या जागी मनीष पांडेची टीममध्ये निवड करण्यात आलीय. 


मुंबईत खेळल्या गेलेल्या 24 टेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय टीममध्ये मुंबईकर क्रिकेटर नसेल तर फास्ट बॉलिंगमधील भारताचं प्रमुख अस्त्र असलेला मोहम्मद शामीसुद्धा दुखापतग्रस्त आहे. त्याच्या जागी भारतीय संघात मुंबईकर शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आलीय. 


मात्र टीममध्ये इशांत शर्मा असल्यानं अंतिम अकरामध्ये शार्दूलला स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे सिरीजमध्ये कमबॅक करण्याचं मोठं आव्हान कुक आर्मीपुढे असणार आहे.